वार्षिक संशोधन कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रकल्पांच्या क्षेत्रिय समस्यांशी संबंधीत उपयोजीत संशोधनाची (Applied Research) कामे करणे व संशोधन अहवाल लिहिणे.
जलसंपदा विभागातील स्थापत्य सामुग्री व माती चाचणी विषयक कामे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते संबंधित चाचणी कामे करणे व उपाययोजना सुचविणे.
सुदूर संवेदन तंत्रज्ञानाने(Remote Sensing) जलाशयांमध्ये साठणाऱ्या गाळांचे सर्वेक्षण, पीक मोजणी व पडताळणी, जमीन वापर आणि जमीन आच्छादन, हिरवे आच्छादन, जल आच्छादन (Hydro Power Study) क्षेत्र मोजणे, GPS mapping इ. कामे करणे.
मेरी / सीडीओ मधील निवासी व अनिवासी इमारती, परिसर व विश्रामगृहांची देखभाल व दुरुस्ती करणे.
जलविज्ञानवधरणसुरक्षितता
जलहवामान विषयक आधार सामग्री संकलन, दृढीकरण, पृथ:करण, साठवणूक व वितरण करणे .
सरितामापन, पर्जन्यमापन व हवामान केंद्रांचे जाळे अद्ययावत करणे.
कृष्णा खो-यासाठी पुर पुर्वानुमानासाठी माहिती संकलीत करण्यासाठी आधार सामग्री पुरविणे.
3.5 द.ल.घ.फु पेक्षा जास्त पाणी वापर असलेल्या प्रकल्पांच्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देणे.
महाराष्ट्रातील सर्व मोठ्या व मध्यम प्रकल्पांचा पूर अभ्यास करणे.
धरणांच्या उपांगाचा प्रतिकृती अभ्यास, धरणांचा समरुपता अभ्यास तसेच पश्चजल अभ्यास करणे.
DRIP –II अंतर्गतच्या १२ प्रकल्पांच्या कामांचे संनियंत्रण करणे.
निवडक मोठी धरणे तसेच सर्व खाजगी धरणांच्या सुरक्षिततेबाबत वार्षिक तपासणी करणे.
धरणांवर बसविलेल्या उपकरणांचे दरवर्षी निरीक्षणे करुन तपशिलवार पृथ:करण अहवाल तयार करणे
भूकंप मापन यंत्रांची देखभाल, दुरुस्ती इ.सह दर तिमाहीचा भूकंप नोदीचा अहवाल सादर करणे.
मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना
राज्यातील सिंचन प्रकल्पांचे (मोठे व मध्यम प्रकल्प, उपसा सिंचन योजना) सर्वसाधारण आराखडे करणे.
धरण, सांडवा, दरवाजे इ. उपांगांची (Components) सविस्तर संकल्पने करणे.
कालव्यावरील महत्वाची बांधकामे व नलिका वितरण प्रणाली इ. ची संकल्पने करणे.
धरणांवरील उपकरणे आराखडा तयार करणे.
बांधकामाधीन व पुर्ण झालेल्या प्रकल्पांच्या बाबतीत उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांवर उपाय योजना सुचविणे.
निमशासकीय/स्थानिक व खाजगी संस्थाकडील संकल्पन कामे (सल्लामसलत तत्वावर) करणे.
खाजगी सल्लागारांनी व अन्य संस्थांनी केलेल्या संकल्पनाचे मुल्यार्पण करणे.
भुतांत्रिक अन्वेषण अहवाल तयार करणे.
जुन्या धरणांची सुरक्षितता तपासणे व बळकटीकरणाची संकल्पने करणे.
महाराष्ट्रअभियांत्रिकीप्रशिक्षणप्रबोधिनी
सर्व स्तरावरील अभियंत्यांसाठी बदलत्या तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आवश्यक प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे.. (पायाभूत, पदोन्नतीनंतर, उजळणी, बदलीनंतर, नवीन विषयाची तोंड ओळख)
शासकिय, निमशासकिय व खाजगी विभाग व संस्थांची प्रशिक्षणे घेणे .
राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती
• बांधकामाधीनप्रकल्प:
रु.५ कोटी पेक्षा जास्त खर्चाच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावांची छाननी आणि मंजुरी.
५कोटी पेक्षा जास्त किमतीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावांची छाननी आणि मंजुरी शासन / पाटबंधारे विकास महामंडळाकडे जमा करण्यासाठी.
प्रवेगक सिंचन लाभ कार्यक्रमासाठी प्रस्तावित केल्या जाणाऱ्या M. I. प्रकल्पाच्या प्रस्तावांची छाननी आणि मंजुरी.
संकल्मपनामधील बदलामुळे खर्चाच्या अंदाजात वाढ होण्याच्या स्वीकारार्हतेची छाननी करा आणि शिफारस करणे.
तांत्रिक सल्ला देणे किंवा सरकारने विशेषत: नमूद केलेल्या इतर कोणत्याही तांत्रिक मुद्द्यावर सरकारला मदत करणे.
मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांबाबत रु. ५.०० कोटी पेक्षा अधिक व रु.२५.०० कोटी पर्यंतची अंदाजपत्रके राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती करीत असलेल्या छाननी प्रमाणे महामंडळ स्तरावर छाननी करुन सदर छाननी अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून मुल्यार्पण (Vetting) करुन प्रशासकीय मान्यतेचे व सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव शासनास सादर करणे.
रु.२५.०० कोटी पेक्षा जास्त किंमतीच्या प्रशासकीय मान्यतेचे व सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावांबाबत राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती मार्फत सविस्तर तपासणी करुन छाननी अहवालासहीत शिफारशी असलेले प्रस्ताव शासनास सादर करणे.