• अ
  • अ+
  • अ-
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00
आंतरराज्य नदी जल लवाद कार्यालय बद्दल

शासन निर्णय, जलसंपदा विभाग, दि. २३.०७.२००३, नुसार अधीक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटा लवाद विशेष कक्ष, पुणे 411001 या कार्यालयाची स्थापना करण्यात आली. (संबंधित राज्य - महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश). शासन निर्णय, जलसंपदा विभाग, दि. ३१.०५.२०१३ नुसार महादयी पाणी तंटा लवादाचे काम या कार्यालयाकडे सोपविण्यात आले आहे. (संबंधित राज्य:- महाराष्ट्र, गोवा  व  कर्नाटक) शासन निर्णय, जलसंपदा विभाग, दि. १७.०४.२०२३ नुसार महानदी पाणी तंटा लवादाचे काम या कार्यालयाकडे सोपविण्यात आले आहे. (संबंधित राज्य  - महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड व मध्यप्रदेश) शासन निर्णय, जलसंपदा विभाग, दि. 24.02.2025 नुसार या मंडळ कार्यालयाचे प्रशासकीय सनियंत्रण मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक यांच्या अधिपत्याखाली सोपविण्यात आले आहे. शासन निर्णय, जलसंपदा विभाग, दि. ०२.०७.२०२५ नुसार नामाभिधान आंतरराज्य नदी जल लवाद कार्यालय, पुणे 411001 असे करण्यात आले असुन कार्यकक्षेत वाढ करण्यात  आली आहे. वाढीव कार्यकक्षेनुसार अस्तित्वातील गोदावरी व नर्मदा खोऱ्यांचेही लवाद विषयक बाबींचे कामकाज तसेच तापी खोऱ्यांचेही कामकाज आणि भविष्यात इतर नदयांचेही (उदा. दमणगंगा, नार-पार) लवाद स्थापन झाल्यास त्याअनुषंगाने उदृद्भवणाऱ्या विधीविषयक व तद्नुषंगिक बाबींचे कामकाज पाहणे. गोदावरी लवादाच्या अनुषंगाने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगना, आंध्र प्रदेश व ओडिसा ही संबंधित राज्य आहेत नर्मदा लवादाच्या अनुषंगाने महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात व मध्यप्रदेश ही संबंधित राज्य  आहेत.   ...

अधिक पहा
फोटो गॅलरी

अधिक पहा

व्हिडिओ गॅलरी

अधिक पहा