• अ+
  • अ-
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

आमच्याबद्दल

आंतरराज्य नदी जल लवाद कार्यालय, पुणे (पूर्वीचे नाव - कृष्णा पाणी तंटा लवाद विशेष कक्ष, पुणे  ) 

                 
                   कृष्णा पाणी तंटा लवाद, विशेष कक्ष, पुणे याची स्थापना दिनांक २३.०७.२००३ च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सिंचनाच्या पाण्याची मागणी आणि या संदर्भात राज्याचा दावा कृष्णा पाणी तंटा लवादासमोर अधिक प्रभावीपणे, सुसंगतपणे आणि परिश्रमपुर्वक करण्यासाठी करण्यात आली आहे. लवादाच्या कार्यवाहीमध्ये राज्यासाठी कायदेशीर समर्थन आणि प्रतिनिधित्व प्रदान करण्यासाठी हे लवाद कार्यालय कार्य करते. यामध्ये कायदेशीर कागदपत्रे तयार करणे, युक्तिवाद तयार करणे आणि कायदे-तज्ज्ञांशी समन्वय साधणे इ. समाविष्ट आहे. त्यानंतर दिनांक १७/०४/२०२३ च्या शासन निर्णयाद्वारे महानदी पाणी तंटा लवादाचे काम या कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. तसेच, महादयी पाणी लवादांतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकांशी संबंधित काम या कार्यालयाकडे दिनांक २६/०६/२०२४ च्या शासन पत्राद्वारे हस्तांतरित केले आहे.

                 महाराष्ट्र राज्यातील कृष्णा खोऱ्यातील सर्व प्रकल्पांच्या पाण्याचा वापर क्षेत्रीय कार्यालयांकडून कृष्णा पाणी लवादाने विहित केलेल्या नमुन्यांमध्ये या कार्यालयांतर्गत एका वेगळ्या विभागाद्वारे लवादाच्या आदेशांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणीच्या दृष्टीने संकलन केला जातो. या कार्यालयात कृष्णा पाणी तंटा लवाद, महानदी पाणी तंटा लवाद व महादयी पाणी तंटा लवाद आणि कृष्णा खोरे पाणी वापराच्या माहीती संकलनाची कामे पार पाडण्यासाठी खालील गटांचा समावेश आहे.

१. कार्यकारी अभियंता, आंतरराज्य नदी जल लवाद कार्यालय, गट क्रमांक १, पुणे

२. कार्यकारी अभियंता, आंतरराज्य नदी जल लवाद कार्यालय, गट क्रमांक २, पुणे

३. कार्यकारी अभियंता, आंतरराज्य नदी जल लवाद कार्यालय, गट क्रमांक ३, पुणे

४. कार्यकारी अभियंता, आंतरराज्य नदी जल लवाद कार्यालय, गट क्रमांक ४, पुणे

५. कार्यकारी अभियंता, संकल्पचित्र विभाग, पुणे