image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

मेटा बद्दल

महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक.

  • महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक स्थापना – दिनांक 20 मे 1964

  • प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, पुणे स्थापना –  दिनांक १० ऑगस्ट १९८३

    प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, छ.संभाजीनगर स्थापना – दिनांक २० ऑक्टोबर १९८३

    प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, नागपूर स्थापना – दिनांक २८ ऑक्टोबर १९८३ 

  • स्टाफ कॉलेज संस्था ही त्यांच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली. सन 2007 साली इजिनिअरींग स्टाफ कॉलेज, नाशिक संस्थेचे महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक असे नामांतर करण्यात आले.

  • महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक (पूर्वीचे नांव - अभियांत्रिकी कर्मचारी महाविद्यालय) ही महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील एक प्रतिष्ठित निवासी प्रशिक्षण संस्था आहे.

  • महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी अंतर्गत जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग सरळसेवा नियुक्त गट अ मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा प्रविष्ट अभियंत्यांचे सेवाप्रवेशोत्तर पायाभुत प्रशिक्षण (52 आठवडे) अभ्यासक्रम आयोजित केले जाते.

  • महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी व प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, पुणे/छ.संभाजीनगर/नागपूर अंतर्गत जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग सरळसेवा नियुक्त गट ब मधील सेवाप्रवेशोत्तर पायाभुत प्रशिक्षण (16 आठवडे) अभ्यासक्रम आयोजित केले जाते.

  • महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी व प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, पुणे/छ.संभाजीनगर/नागपूर अंतर्गत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेतील गट-अ, गट-ब व गट-क संवर्गात कार्यरत अभियंत्यांना नाविन्यपुर्ण तांत्रिक व अतांत्रिक विषयांवर प्रशिक्षण आयोजित केले जाते.

  • शासकीय / निमशासकीय/ खाजगी संस्थांना प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षण कक्ष व निवासी व्यवस्था सशुल्क उपलब्ध करुन दिले जाते.

  • नाविन्यपुर्ण कार्यक्रमा अंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग व वाल्मी, छ.संभाजीनगर च्या धर्तीवर जलसंपदा विभागाचे ‘वाल्मेटा’ अंतर्गत विविध प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात.

  • महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी अंतर्गत जलसंपदा  विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे गट- अ, गट-ब व गट-क वर्ग अभियंता यांची व्यावसायिक परिक्षा आयोजित करुन निकाल जाहीर केला जातो. जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेतील अभियंत्यांसाठी व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.