• अ+
  • अ-
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभाग

    * स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभाग *

 

* विभागाची माहिती व कार्यपध्दती

1)संपूर्ण महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेची (सर्व पाच विभागांसह)लेखा व   

     भांडारविषयक कामे.

2)मेरी परीसरातील जमीनीची देखभाल व पत्रव्यवहार.

3)मेरी/सीडीओ वसाहतीमधील निवासी व अनिवासी इमारती व परीसराची 

    देखभाल व दुरुस्ती.

4)मेरी/सीडीओकडील निवासस्थानांचे वाटप व अनुज्ञप्तीशुल्क वसुलीचा  हिशोब.

5) वसाहती अंतर्गत स्थापत्य विषयक कामांची तांत्रिक तपासणी व मान्यता.

6)मेरी/सीडीओच्या अखत्यारातील विश्रामगृहांची देखभाल व दुरुस्तीचे नियोजन.

7) मेरी या मंडळ कार्यालयातंर्गत असणा-या सामग्री चाचणी विभाग, मृद चाचणी विभाग,संपदा अभियांत्रिकी केंद्र,महामार्ग संशोधन विभाग या विभागांकडील तपासणी शुल्क या विभागांतर्गत महसुल खाती अनामत रक्कम या लेखाशिर्षाखाली (0701 0716 ) जमा केली जाते.

 

*विभागाच्या  अधिपत्याखालील उपविभाग यांचेदारे करण्यात येणारी कामे -

अ)स्थापत्य उपविभाग - या उपविभागामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या निवासी व अनिवासी इमारती व परिसराची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातात. तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या विश्रामगृहाचे कामे देखील पाहिले जाते. या व्यतीरिक्त महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या जमीनविषयक पत्रव्यवहार करणे व न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याचे काम केले जातात.

*ब) निगराणी उपविभाग - या उपविभागामार्फत मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना /महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी /जलविज्ञान प्रकल्प, नाशिक-4  या कार्यालयांतर्गत येत असलेल्या सर्व निवासी व अनिवासी इमारती व परिसराची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातात.

 

*क)विदयुत कक्ष - या उपविभागामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था/मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना/महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी/जलविज्ञान प्रकल्प, नाशिक-4 या कार्यालयांतर्गत येत असलेल्या सर्व निवासी व अनिवासी इमारती व परिसरातील विदयुतीय कामांची देखभाल व दुरुस्ती केली जाते.

 

*ड) यांत्रिकी शाखा - या शाखेमार्फत‍ मा. महासंचालक,संप्रजसंवसु, मेरी, नाशिक यांचेसाठी वापरात असलेले शासकीय वाहन तसेच मेरी संस्थेअंतर्गत असलेली सर्व शासकीय वाहनांच्या देखभाल, दुरुस्तीची तसेच आवश्यक ती यांत्रिकी कामे केली जातात.

 

 


शेवटचे सुधारित केले: ०९ जून २०२५

STYLE SWITCHER

Layout:

BOXWIDE

Background pattern:

imageimageimageimageimageimageimageimageimageimage