• अ+
  • अ-
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

संपदा अभियांत्रिकी केंद्र

 

                    * विभागाची माहिती *

 

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था अंतर्गत असलेल्या पूर्वीच्या पर्यावरण संशोधन विभागाचे 2005 पासून सुदूर संवेदन व भूमाहितीशास्त्र विभाग असे नामकरण करण्यात आले.2005 पूर्वी, 1992 पासून काही अभियंत्यांचा एक गट सुदूर संवेदन या तंत्रावर काम करत होता. हा गट  नव्याने स्थापन झालेल्या विभागात विलीन करण्यात आला. 1 एप्रिल 2015 पासून ‘सुदूर संवेदन व भूमाहितीशास्त्र विभाग’ आणि ‘जलाशय गाळ सर्वेक्षण विभाग’ या दोन विभागांचे विलीनीकरण करून संपदा अभियांत्रिकी केंद्र या नावाने शासनामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था अंतर्गत विभाग तयार करण्यात आला.

संपदा अभियांत्रिकी केंद्र प्रामुख्याने सुदूर संवेदनतंत्र, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, डिफरन्शियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि भौगोलिक माहिती प्रणाली यासारख्या प्रगत तंत्रांवर कार्य करते, आणि या तंत्राचा सहाय्याने जलसंपदाविभागा अंतर्गत असलेल्या तसेच केंद्रीय जल आयोग, TATA, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जलाशयांचे गाळ सर्वेक्षण, महानिर्मिती, बृहन्मुंबई महानगरपालिका, इत्यादी द्वारे प्रदान केकेलेल्या जलाशयांचे गाळ सर्वेक्षण,जलाशयांच्या क्षमतेचे मूल्यमापन, पीक क्षेत्र मोजणी अभ्यास(ऊस, केळी, द्राक्षे), उभे पीक क्षेत्र मोजणी अभ्यास, भू वापर भूआच्छादन अभ्यास,  जल आच्छादन क्षेत्र मोजणी अभ्यास इ.केला जातो.

 

 

               *कार्यपद्धती

                          

  1. सुदूर संवेदन तंत्राने जलाशयातील गाळ सर्वेक्षण करून अद्यावत क्षमता तपासणी सर्वेक्षण
  2. सुदूर संवेदन तंत्राने जलाशयाच्या लाभक्षेत्रामध्ये ऊस पीक क्षेत्र मोजणी
  3. सुदूर संवेदन तंत्राने जलाशयाच्या लाभक्षेत्रामध्ये केळीपीक क्षेत्रमोजणी
  4. सुदूर संवेदन तंत्राने जलाशयाच्या लाभक्षेत्रामध्ये द्राक्षे पीक क्षेत्र मोजणी
  5. हिरवे आच्छादन अभ्यास
  6. भूमापन व भू आच्छादन अभ्यास
  7. जलआच्छादन अभ्यास
  8. प्रमुख प्रकल्पांच्या लाभक्षेत्रामध्ये नागरीकरणामुळे  होणाऱ्या बदलाचा अभ्यास
  9. भिन्न भौगोलिक स्थिती प्रणाली तंत्राने जलाशयाच्या क्षमतेचे मूल्यांकन
  10. भिन्न भौगोलिक स्थिती प्रणाली तंत्राने कालवा व लाभक्षेत्राचे सर्वेक्षण
  11. भिन्न भौगोलिक स्थिती प्रणाली तंत्राने बेंचमार्क/TBM/PBM चे प्रमाणीकरण
  12. जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण.
  13. राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादरीकरण.
  14. सल्लामसलत तत्त्वावरील कामे.
  15. UG/PG/PhD अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण.

प्रशिक्षण

  1. जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना मुलभूत प्रशिक्षण आणि सेवा प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे.
  2. मुलभूत प्रशिक्षणामध्ये सुदूर संवेदन तंत्राचा परिचय, सुदूर संवेदन तंत्राने जलाशयातील गाळ सर्वेक्षण करून अद्यावत क्षमतेचे मूल्यांकन मध्ये 5 दिवसांच्या प्रशिक्षण सत्राचा समावेश आहे. पीक क्षेत्र तपासणी मध्ये सुदूर संवेदन तंत्राचा वापर, इस्रो संकेतस्थळवर उपग्रह प्रतिमा शोधणे आणि ऑर्डर करणे, GPS आणि GPS पाथफाइंडर ऑफिस अज्ञावली आणि टेरा सिंक अज्ञावली चा परिचय, डेटा शब्दकोश कसा तयार करायचा, DGPS, TBS अज्ञावली चा परिचय, DGPS डेटाचा अभ्यास, GPS आणि DGPS हाताळणे इ.

 

*वार्षिक संशोधन कार्यक्रम २०२१*

 

अ.क्र.

प्रकल्प

1

Storage Capacity Assessment of Wan Reservoir by RST

2

Storage Capacity Assessment of Lower Dudhna Reservoir by RST

3

Storage Capacity Assessment of Yedgaon Reservoir by RST

4

Storage Capacity Assessment of Wadaj Reservoir by RST

5

Storage Capacity Assessment of Manikdoh Reservoir by RST

6

Storage Capacity Assessment of Kanher Reservoir by RST

7

Storage Capacity Assessment of Dimbhe Reservoir by RST & DGPS

8

Storage Capacity Assessment of Pimpalgaon Joge Reservoir by RST

9

Storage Capacity Assessment of Koyna Reservoir by RST

10

Storage Capacity Assessment of Manjra Reservoir by RST

11

Storage Capacity Assessment of Terna Reservoir by RST

12

Identification and Measuring Standing crop of Rabbi season of Nashik District 2020

13

Sugarcane Crop Mapping under the Command Area of   Mula Right Bank Canal  Project   (Dist. Ahmednagar)

 

 

 

 

 

* मागील 5 वर्षात झालेली कामे प्राप्त महसुल

वर्ष

पूर्ण झालेले प्रकल्पांची संख्या

प्राप्त महसूल (रुपये लाख़ात)

शासकीय

खाजगी

2016-2017

20

68500

1901667

2017-2018

32

-

-

2018-2019

12

480000

353000

2019-2020

33

935025

1134307

2020-2021

15

2434600

4494123

 

 

 

 

              *विशेष कामे*

  1. 1974-2020 या काळात झालेल्या महाराष्ट्रातील जलाशयातील गाळ सर्वेक्षण करून अद्यावत क्षमता तपासणी साठीचा स्थिती दर्शक अहवाल सन 2020 मध्ये प्रकाशित करण्यात आला व या संदर्भात मा. सचिव लाक्षेवि जसं महाराष्ट्र शासन यांचे मार्फत संबधीतांना प्रशस्तीपत्र प्राप्त झाले 
  2. केंद्रीय जल आयोग,नवी दिल्ली द्वारे संपदा अभियांत्रिकी केंद्र,महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिकयांना सल्लामसलत तत्त्वावरसुदूर संवेदन तंत्राचा वापर करून भारतातील 23 जलाशयाचा गाळ सर्वेक्षण अभ्यास पूर्ण करण्यात आला आहे. व त्या संदर्भात केंद्रीय जल अयोग्य नवी दिल्लीतर्फे“Letter of Completion”  प्राप्त झाले आहे. या कार्यसंदर्भात माँ. महासंचालक संप्रजसंसु मेरी यांचे प्रशस्तिपत्रक संबंधितांना प्राप्त झाले आहे.
  3. शोधनिबंध  कु. एस. जी. कुवर,श्री.एस ए गायकवाड व श्री.एम. एम. कुलकर्णी द्वारा लिखित “Assessment of Grape Crop Acreage using Geospatial Technique For Command area under Palkhed Reservoir” ला आंतराष्ट्रीय परिषद HYDRO-2020मध्ये सर्वोत्कृष्ट शोध निबंध म्हणून घोषित करण्यात आला.
  4. शोधनिबंध  कु.ए.पी.जाधव,श्री.एस ए गायकवाड व श्री.एम एम. कुलकर्णी द्वारा लिखित “Assessment of Banana crop acreage using geospatial technique for specified command area of Hatnur reservoir (Maharashtra) " ला आंतराष्ट्रीय परिषद  HYDRO-2019 मध्ये सर्वोत्कृष्ट शोध निबंध म्हणून घोषित करण्यात आला.
  5. पूर्णझालेले संशोधन निबंध  (परिषद आणि जर्नल्स)

 

वर्ष

शोधनिबंध संख्या

2016-2017

3

2017-2018

6

2018-2019

4

2019-2020

5

2020-2021

6

2021-2022

7

 

 

 

अ.क्र.

प्रकल्प

 

Out of ARP

1

GPS Mapping of Underground pipepline from Lendi Project, Dist. Nashik

2

Hydro-Cover Mapping for Aurangabad Revenue Region Pre monsoon and Post Monsoon 2021-22

 

Consultancy Works (Tata Power)

1

Feasibility Report Assessment of Kundali Reservoir

2

Capacity Assessment of Mulshi Reservoir Through Geospatial Technique

3

Capacity Assessment of Shirota Reservoir Through Geospatial Technique

4

Capacity Assessment of Walvhan Reservoir Through Geospatial Technique

5

Capacity Assessment of Thokarwadi Reservoir Through Geospatial Technique

 


शेवटचे सुधारित केले: ०९ जून २०२५