• अ+
  • अ-
  • Services
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

प्रसार धोरण

जलविज्ञान प्रकल्प (भूपृष्ठ जल), नाशिक, महाराष्ट्र राज्य (भारत) येथील आधार सामग्री वितारणाचे धोरण 

(जलविज्ञान प्रकल्प टप्पा-१ व जलविज्ञान प्रकल्प टप्पा-२)

दि.२७ जून, २००५ रोजी घेण्यात आलेल्या जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटाच्या तिस-या समन्वयक समितीमध्ये खालील प्रमाणे आधार सामग्रीच्या दराचे धोरण ठरविण्यात आले आहेत. खालील आधार सामग्री दराच्या धोरणास महाराष्ट्र शासनाने दि. १० जून, २०११ रोजी पुन:श्च मान्यता दिली.    

जलहवामान केंद्राच्या प्रकारानुसार आधार सामग्रीचे मूल्य:

  • स्वयंचलित पर्ज्यन्यमान केंद्र-रु.२२५/केंद्र/वर्ष
  • साधे पर्ज्यन्यमान केंद्र-रु.२२५/केंद्र/वर्ष 
  • हवामान केंद्र-रु.२२५/केंद्र/ पॅरामीटर/वर्ष
  • सरिता मापन केंद्र-रु.६००/केंद्र/वर्ष
  • गाळभार केंद्र-रु.६००/केंद्र/वर्ष 
  • जलगुणवत्ता-रु.२४०/केंद्र/ पॅरामीटर /वर्ष 

आधार सामग्री मागणीच्या हेतूप्रमाणे आकारण्यात येणारे दर:

हेतू

आकारण्यात येणारे दर 

१. अनुदान प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी

निशुल्क 

(विद्यार्थ्याला कोणतेही अनुदान प्राप्त नसल्यास- १००% सवलत)

२. संशोधन व शैक्षणिक अभ्यासाकरीता अनुदान प्राप्त असल्यास 

आधार सामग्री मूल्याच्या २५% दर आकारण्यात येतील

३. वैयक्तिक शेतक-याला शेतकी कामासाठी

आधार सामग्री मूल्याच्या ५०% दर आकारण्यात येतील

४. खासगी संस्था

आधार सामग्री मूल्याच्या दुप्पट दर आकारण्यात येतील

 

  • आधार सामग्री उपभोक्ता गटाच्या सदस्यांनाच आधार सामग्री पुरविण्यात येईल. 
  • फक्त दृढीकृत झालेली आधार सामग्री पुरविण्यात येईल. 
  • खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून उपभोक्ता गटाच्या सदस्यांना आधार सामग्रीचे वितरण करण्यात येईल.
    • पुरविण्यात आलेली आधार सामग्री फक्त पर्यावरणावरील परिनामाचे मुल्यांकन करणे करीता वापरण्यात यावी ज्याकरिता आधार सामग्रीची मागणी करण्यात आलेली आहे.. 
    • राज्य आधार सामग्री साठवण कक्ष व्यवस्थापकाची परवानगी न घेता वितरीत केलेल्या आधार सामग्रीची कोणत्याही स्वरूपातील प्रसिद्धी करण्यास सक्त मनाई आहे.
    • वितरीत केलेल्या आधार सामग्रीचे व्यावसायिक उपयोगाकरिता पुनःविक्री किंवा हस्तांतरण करण्यात येऊ नये. 
    • वितरीत केलेल्या आधार सामग्रीच्या आधारे काढलेल्या निकषासाठी उपभोक्ता पूर्णपणे जबाबदार राहील व या माहितीच्या वापरामुळे कोणत्याही प्रकारे हानी किंवा नुकसान झाल्यास राज्य आधार सामग्री साठवण केंद्राचे व्यवस्थापक जबाबदार राहणार नाही.
    • जर सदर आधार सामग्री विद्यार्थ्यांना संशोधनाकरिता निशुल्क पुरविण्यात आली असल्यास, सदर विद्यार्थ्याने त्याच्या संशोधन अहवालाची एक प्रत जलविज्ञान प्रकल्पास द्यावी.

शेवटचे सुधारित केले: Invalid date format