• अ+
  • अ-
  • Services
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

जलविज्ञान प्रकल्पाचे उदिष्टे

जलविज्ञान प्रकल्प (भूपृष्ठजल), महाराष्ट्र राज्य यांचे उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत. 

जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र.१ चे उद्दिष्ट 

  • आधारसामग्री मूलभूत मापदंडे मापन आणि संकलनासाठी आधुनिक तंत्र आणि उपकरणे वापरणे.
  • ‘स्वदेस’ व ‘हायमॉस’ या संगणक प्रणालीद्वारे  जलहवामन व जलगुणवत्ता आधार सामग्रीचे संगणीकृत दृढीकरण करणे 
  • जलहवामन व जलगुणवत्ता आधार सामग्रीचे सोप्या व युजर फ्रेंडली पद्धतीने वितरण करणे. 
  • जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटातील पात्र सभासदाकरीता प्रकाशने वाढविणे व इतर माहिती उपलब्ध करून देणे.
  • जलहवामान आधार सामग्री संकलन केंद्रांचे व जलगुणवत्ता प्रयोगशाळेचे स्तर उंचावणे. 
  • जलस्त्रोत व इतर गोष्टींचे नियोजन करणे 
  • मुलभूत जलस्त्रोताचे व संबंधित कामाचे मूल्यमापन करणे 
  • पूर नियंत्रक प्रणालीचे मजबुतीकरण करणे. 
  • जलसाठ्याचे गाळ अभ्यास करणे

जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र.२ चे उद्दिष्ट 

  • जलस्त्रोतिय नियोजन व व्यवस्थापन संबंधित असलेल्या संभाव्य वापरकर्त्यांनी विश्वसनिय व प्रभावी जलशास्त्रीय माहिती प्रणालीचा वापर वाढविणे. 
  • राज्य / केंद्रातील संस्थेमध्ये पाण्याशी संबंधित गुंतवणूकीमधील उत्पादनामध्ये प्रभावी वाढ होणेसाठी.

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाचे उद्दिष्टे 

  • जलविज्ञान प्रकल्प टप्पा १ व २ अंतर्गत निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा सुस्थितीत ठेवणे, त्याची देखभाल व दुरुस्ती व दर्जावाढ
  • जलविज्ञान प्रकल्प टप्पा २ अंतर्गत क्रिष्णा व भीमा खोऱ्याकरीता एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. टप्पा-३ मध्ये पंचगंगा उपखोऱ्यात अशीच यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावित आहे.
  • एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली व संगणक आज्ञावली विकसित करणे या बाबी उर्वरित महाराष्ट्रातील गोदावरी खोरे, तापी खोरे, विदर्भातील वैनगंगा खोरे व पश्चिम वाहिनी नदी खोरे (अंशत:) ह्या नदीखोऱ्यात प्रस्तावित आहे.
  • बॅथीमेट्रिक उपकरणे खरेदी करणे


१३ जून २०२५