एककालिक आधार सामग्री प्रणालीची संरचना
एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली (RTDAS) खालील तीन टप्प्यामध्ये कार्य करते
आधार सामग्री संकलन प्लॅटफॉर्म (डीसीपी) :
या प्लॅटफॉर्म अंतर्गत सेन्सर बसविले असतात तसेच या द्वारे विविध सेन्सरला वीज पुरवठा करणे, सौर उर्जा वापरुन बॅटरी चार्ज करणे, डेटा लॉगरमध्ये डेटा साठविणे आणि धूळ,पाणी आणि चोरीपासून उपकरणांना संरक्षण प्रदान करणे, इत्यादी कामे करण्यात येतात. एककालिक केंद्राच्या जाळ्यामधील बर्याच केंद्रांवर कोणतेही वीज कनेक्शन नसल्यामुळे बॅटरीज सौरउर्जेने चार्जिंग केल्या जातात.
टेलीमेट्री उपकरणे:
ही उपकरणे डीसीपी डेटा लॉगर मधून माहिती गोळा करतात व योग्य टेलिमेट्री पद्धतीने डेटा सेंटरला माहिती प्रक्षेपित करतात. या प्रकल्पांतर्गत प्रस्तावित टेलिमेट्री पद्धतीत ग्लोबल सिस्टम फॉर मोबाइल (GSM) / जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस (GPRS), इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टम (INSAT) आणि व्हेरी स्मॉल अॅपर्चर टर्मिनल (VSAT) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली:
राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व खोऱ्यामध्ये बसविण्यात येणाऱ्या/ आलेल्या एककालिक आधार सामग्री संकलन प्रणालीचे जाळे खालील प्रमाणे आहे
अ.क्र. |
केंद्रांचे प्रकार |
ऊर्ध्व गोदावरी खोरे (मराठवाडा) |
तापी खोरे |
कृष्णा-भीमा खोऱ्यातील विस्तार |
कोकण क्षेत्र |
निम्न गोदावरी खोरे (विदर्भ) |
एकूण |
---|---|---|---|---|---|---|---|
१ |
स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र (ARS) |
२१४ |
१११
|
१६६ |
५७ |
७२ |
६२० |
२ |
स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) |
२८ |
१० |
४५ |
४ |
३ |
९० |
३ |
स्वयंचलित जलाशय पाणी पातळी (ARWL) |
५० |
३९ |
५५ |
१२ |
६३ |
२१९ |
४ |
स्वयंचलित सरिता पाणी पातळी व सरिता विसर्ग मापन केंद्र (ARWL & RDS) |
३३ |
२२ |
४८ |
२० |
२९ |
१५२ |
५ |
बाष्पीभवन पात्र (E- Pan) |
४५ |
१६ |
१८ |
३ |
२४ |
१०६ |
११८७ |
महाराष्ट्र राज्यातील खोरेनिहाय एककालिल आधार सामग्री संकलन प्रणाली अंतर्गत केंद्रांची यादी:
ऊर्ध्व गोदावरी खोरे (मराठवाडा)
तापी खोरे
कृष्णा-भीमा खोऱ्यातील विस्तार
अतिरिक् RTDAS पुणे
कोकण क्षेत्र (पश्चिम वाहिनी नद्या)
निम्न गोदावरी (विदर्भ क्षेत्र)
(सोबत जोडले आहे)