परिचय
जलविज्ञान प्रकल्प -२ अंतर्गत राज्यातील महाराष्ट्र राज्यातील कृष्णा व भीमा खोऱ्यात एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली बसविण्यात व कार्यान्वित करण्यात आली आहे. कृष्णा - भीमा खोऱ्याकरीता एककालिक निर्णय पूरक प्रणाली अंतर्गत पूरांचे अंदाज व जलाशय एकात्मिक परिचालन प्रणाली विकसित करण्यात आली. या प्रणालीचा वापर करून पुराचे नियोजन व जलाशयाचे बहुउद्देशीय व इष्टतम उपयोग होणे शक्य होईल. जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र.-१ अंतर्गत जलहवामान केंद्रांचे जाळे उभारण्यात आले असून पर्जन्यमापन केंद्रे, सरीता मापन केंद्रे, हवामान केंद्रे, जलाशय पाणी पातळी मापन केंद्रे, इत्यांदींचा यामध्ये समावेश होतो. जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र.-२ अंतर्गत कृष्णा-भीमा खोऱ्यामध्ये सदर केंद्रांचे अद्यावतीकरण करणेसाठी विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स, आधार सामग्री संकलन प्लॅटफॉर्म (डीसीपी), सौर पॅनल, सौर प्रभारक व विद्युत घट इत्यादी उपकरणे व व्ही-सॅट, जीएसएम दूरसंचार प्रणालीचा वापर करून जलहवामान आधार सामग्री दर १५ मिनटांच्या अंतराने आधार सामग्री साठवणा केंद्र, पुणे येथे एककालिक पद्धतीने संकलित करण्यात येते. सदर प्रणालीद्वारे प्राप्त एककालिक आधार सामग्री व आरआईएमईएस (RIMES) बँककॉक व एनसीएमआरडब्लूएफ (NCMRWF), नवी दिल्ली कडून ९ कि.मी. X ९ कि.मी. क्षेत्राच्या ग्रीडसाठी प्राप्त झालेल्या पर्जन्यमानाच्या अंदाजाच्या आधारे जलविज्ञान प्रकल्प टप्पा क्र.-२ मध्ये निर्णय पूरक प्रणाली विकसित करण्यात आली. एककालिक आधार सामग्री निर्णय पूरक प्रणालीच्या वापराने जलाशयातील पाण्याचे व्यवस्थापन वेळेवरती करणे व विविध विभागांनी पुराचे नियोजन करणे सुलभ होते. जलाशयातील पाण्याची पातळी, पाण्याची आवक – जावक, नदीची पाणी पातळी व विसर्ग इत्यादी आगाऊ माहितीद्वारे जलाशयाचे इष्टतम वापर करून घेणे शक्य होते. या सोबतच, पुराच्या तडाख्यापासून बचाव व कृषी उत्पादनामध्ये वाढ या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधून जलाशयातील पाण्याचे इष्टतम उपयोग करणेस सदर जलाशय परिचालन प्रणाली फायदेशीर आहे.
प्रमुख सल्लागार म्हणून डीएचआय (इंडिया), वॉटर अँड एनव्हायर्नमेन्ट प्रा.ली. नवी दिल्ली व उपसल्लागार म्हणून डीचआय, डेनमार्क अँड रिवरसाईड टेकनॉलॉजि, युएसए यांच्या सल्ल्याने कृष्णा-भीमा खोऱ्या करीता एककालिक पूरांचे अंदाज व धरणातील पाण्याचे परिचालन प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
सदर प्रकल्पांतर्गत कस्टमाइज्ड मायिक (MIKE) मॉडेलच्या सहाय्याने विकसित करण्यात आलेल्या प्रतिकृती (मॉडेल) मध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
पूर्वानुमान प्रणालीचे क्रमवार टप्पे
|
सन २०१३ च्या पावसाळ्या पासून एककालिक पूरांचे अंदाज व धरणातील जलाशयाचे परिचालन प्रणाली अंतर्गत एकत्रित केलेली माहिती क्षेत्रीय जलाशयांच्या व्यवस्थापकांना पुरविण्यात येते. ‘http://www.rtsfros.com/mahakrishna’ या संकेतस्थळावर ‘फोरकास्ट मेनू’ अंतर्गत सर्व उपभोक्त्यांना एककालिक पुराचे पूर्वानुमान उपलब्ध करून दिले आहे.
प्रतिकृतीची (मॉडेल) क्षमता