• अ+
  • अ-
  • Services
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली परिचय

सर्वसाधारण वर्णन  

एककालिक जलहवामान सनियंत्रण प्रणालीचा वापर करून घेण्यात आलेले जलहवामान विषयक निरीक्षणे, निर्णय प्रक्रियेत खूप महत्वाची भूमिका बजावतात. जलसंपत्तीचे एककालिक ज्ञान योजनाधारकांना पूर अंदाज, पाणीपुरवठा व्यवस्थापन, सिंचन, जलविद्युत निर्मिती तसेच पर्यावरणीय देखरेखीसाठी आणि नियोजनासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत करते.  जलहवामान विषयक एककलिक निरीक्षणे जल संसाधनांच्या वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्यास उपयुक्त आहेत एककालिक निर्णय पूरक प्रणाली जलहवामान आधार सामग्रीला खऱ्या अर्थाने संजीवनी देतात. सदर प्रणालीचा वापर करून वापरकर्त्यांना कार्यपद्धतीचे विविध निकष लावून त्याचा पर्रिणाम जलद , परिणामकारक व सातत्याने तपासणे शक्य होते.  

जलशास्त्रीय माहिती प्रणाली (HIS) ची रचना जलचक्रातील सनियंत्रण करण्यासाठी केली गेली आहे, ज्यामध्ये पाऊस, बाष्पीभवन, नद्यांचा प्रवाह, भूजल पुनर्भरण आणि उतारा इत्यादींचा समावेश आहे. आधुनिक जलशास्त्रीय माहिती प्रणाली (HIS)मध्ये, स्वयंचलित टेलिमेट्रिक उपकरणांचा वापर करून एककालिक पद्धतीने जल-हवामान विषयक विविध प्रकार मोजले व प्रक्षेपित केले जातात.  एककालिक जलशास्त्रीय माहिती प्रणाली (HIS)मध्ये, सेन्सर, आधारसामग्री संकलन प्लॅटफॉर्म, वीजपुरवठा, टेलिमेट्री, आधारसामग्री व्यवस्थापन प्रणाली आणि वितरण प्रणाली इत्यादींचा समावेश होतो.

 

एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली (RTDAS) खालील तीन टप्प्यामध्ये कार्य करते 

आधार सामग्री संकलन प्लॅटफॉर्म  (डीसीपी) : 

या प्लॅटफॉर्म अंतर्गत सेन्सर बसविले असतात तसेच या द्वारे विविध सेन्सरला वीज पूरवठा करणे, सौर ऊर्जा वापरुन बॅटरी चार्ज करणे, डेटा लॉगरमध्ये डेटा साठविणे आणि धूळ,पाणी आणि चोरीपासून उपकरणांना संरक्षण प्रदान करणे, इत्यादी कामे करण्यात येतात. एककालिक केंद्राच्या जाळ्यामधील बर्‍याच केंद्रांवर कोणतेही वीज कनेक्शन नसल्यामुळे बॅटरीज सौरउर्जेने चार्जिंग केल्या जातात.

 

टेलीमेट्री उपकरणे:

ही  उपकरणे  डीसीपी डेटा लॉगर मधून माहिती गोळा करतात व योग्य टेलिमेट्री पद्धतीने डेटा सेंटरला माहिती प्रक्षेपित करतात. या प्रकल्पांतर्गत प्रस्तावित टेलिमेट्री पद्धतीत ग्लोबल सिस्टम फॉर मोबाइल (GSM) / जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस (GPRS), इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टम (INSAT) आणि व्हेरी  स्मॉल अ‍ॅपर्चर टर्मिनल (VSAT) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. 

 

डेटाबेस  व्यवस्थापन प्रणाली:

डेटा सेंटरमध्ये सदर प्रणाली कार्यान्वित केलेली असून टेलीमेट्री उपकरणाद्वारे कार्यक्षेत्रातील एककालिक माहिती प्राप्त करते. त्यानंतर आधारसामग्री ची गुणवत्ता आणि सुसंगतत संरचितता तपासुन स्वरूपात संग्रहित करून उपभोक्त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जाते. या विभागातून राष्ट्रीय डेटाबेस व्यवस्थापन सॉफ्टवेअर जसे ई-स्विस/विम्स याद्वारे सर्व केंद्रीय संस्था (सहभागी संस्थाना) माहिती पुरविण्यात येते.

 

एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली (RTDAS) वैशिष्ट्ये 

  • जलविज्ञान प्रकल्प (भूपृष्ठ जल), महाराष्ट्र अंतर्गत एककालिक जलहवामान आधार सामग्री संकलन प्रणाली राबविण्यात आलेली असून यामध्ये विविध खो-यातील पाण्याची संभाव्य आवक व अनुषंगिक बाबींसाठी आवश्यक असणा-या आधार सामग्री संकलनाचे महत्वाचे काम केले जाते. 
  • एककालिक आधार सामग्री संकलन  प्रणाली (RTDAS) मध्ये स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र, स्वयंचलित हवामान केंद्र आणि स्वयंचलित सरितामापन व जलाशयातील पाणी पातळी मापन केंद्र या टेलिमेट्री उपकरणाच्या जाळ्याचा समावेश होतो व याद्वारे सदर प्रणालीला माहिती पुरवठा करण्यात येते. 
  • आधुनिक डेटा लॉगर, डेटा साठवण प्रणाली, डेटा प्रोसेसिंग, डेटा कॉम्म्युनिकेशन टेकनॉलॉजी या सर्व गोष्टींचा एकत्रित लाभ घेऊन सदर संकल्पनेची अंमलबजावणी या महत्वाकांक्षी प्रकल्पात केली आहे. 
  • एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली मध्ये जास्तीत जास्त विश्वासार्हता असून सदर प्रणालीमध्ये शक्य तेवढ्या प्रमाणात देखभाल दुरुस्ती कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

एककालिक आधार सामग्री संकलन प्रणालीचे (RTDAS) फायदे 

  • एकूण खर्चातील बचत
  • आधार सामग्रीची  उच्च वारंवारता 
  • प्रतिकूल परिस्थितीत चांगली संवेदन क्षमता 
  • प्रतिकुल परिस्थितीत सुद्धा केंद्रे कार्यान्त्वित ठेऊ शकतो
  • संकलित माहितीची सहज उपलब्धता
  • मोजमापातील सुसंगतता 
  • स्वयंचलित संकलन क्षमता

 

मोजमापन वारंवारता

केंद्राचे प्रकार

मोजमापन प्रकार व एकक 

संकलनाचे प्रकार

वारंवारता

स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र  (एआरएस) 

पर्जन्यमान  (एमएम)*

एकत्रित

 

दर ६० मि

स्वयंचलित हवामान केंद्र  (एडब्लूएस/एएफसीएस)

किमान तापमान  (°से) *

   

तत्कालिक 

कमाल तापमान  (°से) *

 

किमान आर्द्रता (%)*

 

किमान वाऱ्याचा वेग (मी/सेकंद) *

 

कमाल वाऱ्याचा वेग (मी/सेकंद) *

 

किमान वातावरणीय दाब (एचपीए) *

 

कमाल वातावरणीय दाब (एचपीए) *

एकत्रित

कमालसौर विकिरण (डब्लू/वर्ग मी.)*

एकत्रित

स्वयंचलित जलाशय पाणी पातळी व उत्प्रवाह मापन केंद्र  (एआरडब्लूएल अँड ओडीएस)

जलाशयाची पाणी पातळी (मी.) *

 

तत्कालिक

ग्रॉस कन्टेन्ट (दलघमी)

 

% कन्टेन्ट (%)

 

लाईव्ह कन्टेन्ट (दलघमी)

 

विसर्गाचा दर (क्युमेक्स)*

 

स्वयंचलित सरिता पाणी पातळी व सरिता विसर्ग मापन केंद्र (एआरडब्लूएल अँड आरडीएस)

नदी पातळी (मी.) *

 

तत्कालिक 

स्टेज डिस्चार्ज (क्युमेक्स)

 

 

(एआरजी / एआरएस : स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र

(एडब्लूएस/एएफसीएस)   : स्वयंचलित हवामान केंद्र

(एआरडब्लूएल अँड आरडीएस)   : स्वयंचलित सरिता पाणी पातळी व सरिता विसर्ग मापन केंद्र 

(एआरडब्लूएल अँड ओडीएस) : स्वयंचलित जलाशय पाणी पातळी व उत्प्रवाह मापन केंद्र
 

टिपणी: वरील तक्त्यात ‘*’ ने खूण केलेले प्रकार/प्राचल क्षेत्रीय निरीक्षणा प्रमाणे आहेत 

 

शेवटचे सुधारित केले: १३ जून २०२५