प्रसार प्रक्रिया
राज्य आधार सामग्री साठवण कक्ष, नाशिक येथे आधार सामग्री विनंती सादर करणेसाठी वापरकर्ता मार्गदर्शिका
आधार सामग्री विनंती सादर करणे अगोदर या संकेतस्थळावरून जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटाचे सदस्यत्व घेणे अपरिहार्य आहे. कृपया ‘जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गट’ या टॅबमध्ये ‘सदस्य वापर्कता मार्गदर्शिका’ पहा. सदस्यत्व प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला ‘सदस्यत्व नोंदणी क्रमांक’, ‘युजर नेम व पासवर्ड’ मिळेल. याचा वापर ऑनलाईन किंवा ऑफलाईन आधार सामग्री विनंती अर्ज सादर करणेसाठी पुढे होणार आहे. जर तुमच्याकडे यापूर्वीचे ‘सदस्यत्व नोंदणी क्रमांक’ असेल तर कृपया ‘जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गट’ या टॅबमध्ये ‘जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटाची यादी’ वर जाऊन आपल्या सदस्यत्वाची माहिती प्राप्त करावी.
आधार सामग्री विनंती सादर करणेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये मुख्य पृष्ठावर असलेल्या ‘एचडीयु लॉगईन’ या टॅबद्वारे ऑनलाईन आधार सामग्री विनंती सादर करू शकतो. दुस-र्या पद्धतीमध्ये ऑफलाईन मार्गाने आधार सामग्री विनंती सादर करता येते.
- राज्य आधार सामग्री साठवण कक्ष, नाशिक येथे ऑनलाईन पद्धतीने आधार सामग्री विनंती सादर करणे
- जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटाच्या सदस्याने मुख्य पृष्ठावर असलेल्या ‘एचडीयु लॉगईन’ टॅबद्वारे ‘युजर नेम व पासवर्ड’ वापरून लॉगईन करावे. सदस्याची नोंदणी करतांना जो ई-मेल आयडी दिला असेल तो वरील लॉगईन करतांना युजर नेम असेल व सदस्याची नोंदणी करतांना जो सदस्याने पासवर्ड ठेवला असेल तो पासवर्ड वरील लॉगईन करीता वापरता येईल.
- ‘एचडीयु लॉगईन’ वरती पुरविण्यात आलेल्या ‘आधार सामग्री विनंती अर्ज भरणे’ या टॅबवर क्लिक करा.
- ‘जलविज्ञान प्रकल्पाची केंद्रे शोधा’ या टॅबच्या साहाय्याने व लॉगईन अंतर्गत पुरविण्यात आलेल्या केंद्रांचे नकाशे व केंद्रांची यादी वापरून आधार सामग्री विनंती अर्ज भरणे करीता, केंद्रांची नावे निश्चित करा.
- लॉगईन अंतर्गत पुरविण्यात आलेल्या ‘आधार सामग्री उपलब्धता व आधार सामग्री अर्ज भरणे’ या टॅबचा वापर करून ‘आधार सामग्रीचे प्रकार’, ‘आधार सामग्री वारंवारता’, ‘कालावधी’ इत्यादी करीता वर्गीकरण करावे. नंतर ‘आधार सामग्री अंदाजित शुल्क’ या टॅबवर क्लिक करून आधार सामग्रीची अंदाजित किंमत माहित करून घेणे.
- आधार सामग्री विनंती अर्जात भरलेल्या केंद्राचे विवरण व आधार सामग्रीचे शुल्क इत्यादी माहिती तपासून घेणे व ‘आधार सामग्री विनंती अर्ज पाठवा’ या टॅबवर क्लीक करून अर्ज अंतिम करून सादर करावे.
- अर्ज सादर केल्यानंतर, सदस्यांनी खालील खालील तक्त्यात दिलेल्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी ‘कागदपत्रे सादर करा’ या टॅबवर क्लिक करून अपलोड करावी. सदस्यांच्या वर्गवारी प्रमाणे कागदपत्रे पाठवावीत. तसेच कागदपत्रांची मूळप्रत/सत्यप्रत ‘जलविज्ञान प्रकल्प, नाशिक’ येथे पोस्टाने अथवा स्वत: येऊन सादर करावी. आधार सामग्रीचे वितरण सदर कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतरच होईल, याची सदस्यांनी दक्षता घ्यावी.
अ.क्र.
|
जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता सदस्याची वर्गवारी
|
आवश्यक कागदपत्रे
|
01
|
शैक्षणिक/विद्यार्थी/संशोधन
|
- पीएचडी चालू असल्यास‘पीएचडी नोंदणी प्रमाणपत्र
- शैक्षणिक संस्थेचे खालील निर्दीष्ठीत करणारे पत्र-
-आधार सामग्री विनंती अर्जात नमूद संशोधनासाठी कोणतेही अनुदान प्राप्त नाही .
-आधार सामग्री केवळ शैक्षणिक कामासाठी वापरल्या जाईल.
- ‘माझे संशोधन किंवा ठराविक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर संशोधनाचा अहवाल सॉफ्ट किंवा हार्ड स्वरूपात एक प्रतित जलविज्ञान प्रकल्प नाशिक येथे प्राप्त करून देईल’ असे स्पष्ठ करणारे सदस्याचे हमी पत्र
- संशोधनाचे किंवा अभ्यासाचे एका पानात गोषवारा
- सदस्याच्या आधार कार्डची दोन्ही बाजूची छायाप्रत .
|
02
|
शासकीय/निमशासकीय
|
निरंक
|
03
|
खासगी
|
निरंक
|
04
|
शेतकरी
|
- तलाठी कार्यालयाकडून प्राप्त ७/१२ गोषवारा
|
05
|
शैक्षणिक संस्था

- सदस्याच्या आधार कार्डची दोन्ही बाजूची छायाप्रत
|
06
|
बिगर सरकारी संस्था
|
निरंक
|
07
|
वैयक्तिक
|
निरंक
|
वरील नमूद कागदपत्रांचे फॉरमॅटसाठी खाली क्लिक करावे:

- आता तुमचे अर्ज राज्य आधार सामग्री साठवण कक्ष, नाशिक येथे पाठविण्यात येईल. तुम्ही आधार सामग्री विनंती अर्जाची प्रगती ‘आधार सामग्री विनंती अर्ज सद्यस्थिती’ या टॅबवर क्लिक करून बघू शकता.
- तुमच्या विनंती अर्जाची सद्यस्थिती ‘आधार सामग्री काढणे’, ‘आधार सामग्रीचे देयक तयार करणे’, ‘धरिकेस मान्यता’, ‘सादरीकरण/देयक अदा करणे’ व ‘आधार सामग्रीचे वितरण’ या पाच टप्प्यात दिसेल.
- आधार सामग्रीचे देयक ‘आधार सामग्री विनंती अर्ज सद्यस्थिती’ या टॅबवर उपलब्ध असेल. शैक्षणिक कारणास्तव: जर शैक्षणिक कारणास्तव आधार सामग्रीची मागणी केली असल्यास व आधार सामग्रीचे शुल्क रु.१०,०००/- पेक्षा जास्त असल्यास संबंधित सदस्याला जलविज्ञान प्रकल्प कार्यालय, नाशिक येथे सादरीकरण द्यावे लागेल. सदर सादरीकरनामध्ये आपल्या संशोधनासाठी या कार्यालयास मागितलेल्या आधार सामग्रीची उपयुक्ता स्पष्ठ करावी लागेल.
- आधार सामग्रीचे देयक ऑनलाईन, ऑफलाईन किंवा बँक ट्रांझेकशन अशा तीन पद्धतीने भरता येऊ शकते. ऑनलाईन देयक भरणेकरीता ‘आधार सामग्री विनंती अर्ज सद्यस्थिती’ या टॅबवर लिंक उपलब्ध आहे. ऑफलाईन देयक जलविज्ञान प्रकल्प विभाग/उपविभागात भरता येऊ शकते. जलविज्ञान प्रकल्प विभागाची यादी ‘जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गट’ या टॅब अंतर्गत ‘जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गट कक्ष’ मध्ये उपलब्ध आहे.
- आधार सामग्रीचे शुल्क जवळील स्टेट बँकेत जमा करून ‘बँक ट्रांझेकशन आयडी’ ‘बँक ट्रांझेकशन’ या टॅब अंतर्गत सबमिट करावे. ‘जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गट’ या मुख्य पृष्ठावरील टॅब मधील ‘देयक माहिती’ या अंतर्गत सुद्धा सदर माहिती सबमिट करू शकता. स्टेट बँकेचे नॉन-होमब्रांचमुळे अतिरिक्त ट्रांझेकशन चार्जेस लागू राहतील.
- आधार सामग्रीचे देयक अदा झाल्यानंतर व धारीकेस अंतिम मान्यता मिळाल्यानंतर, मागितलेली आधार सामग्री सदस्याच्या संकेतस्थळावरील खात्यावर अपलोड करण्यात येईल. सदर माहिती अपलोड केल्यानंतर, आधार सामग्री वितरीत केल्याचा एस.एम.एस. व ईमेल सदस्यास प्राप्त होईल.
- डेटा फाईल अपलोड केल्यापासून १५ दिवसांकरीता सदस्याच्या संकेतस्थळावरील खात्यावर डाउनलोड करणेकरीता उपलब्ध असेल व नंतर संकेतस्थळाद्वारे आपोआप हटविण्यात येईल.
- डेटा डाउनलोड केल्यानंतर, जलविज्ञान प्रकल्प नाशिक कार्यालयाकडून पुरविण्यात आलेल्या या सेवेमध्ये काही सुधारणा भासत असल्यास किंवा सद्यस्थितीतील सदर सेवेसाठी काही अभिप्राय असल्यास सदस्य ‘जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटाच्या सदस्याचे अभिप्राय’ या टॅबद्वारे कळवू शकतो.
- विद्यार्थी किंवा संशोधक सदस्य त्यांचे अभ्यास पूर्ण झाल्यानंतर ‘संशोधन प्रकल्प अहवाल पाठवा’ या टॅबद्वारे त्यांचे संशोधन अहवाल जलविज्ञान प्रकल्प कार्यालयास पाठवू शकतो. सदर अहवाल या कार्यालयास पाठविणे सदस्यांवरती हमी पत्रात नमूद केल्याप्रमाणे बंधनकारक राहील.
राज्य आधार सामग्री साठवण कक्ष, नाशिक येथे ऑनलाईन पद्धतीने आधार सामग्री विनंती सादर करणेसाठी प्रवाह तक्ता

- राज्य आधार सामग्री साठवण कक्ष, नाशिक येथे ऑफलाईन पद्धतीने आधार सामग्री विनंती सादर करणे
- आधार सामग्री विनंती अर्ज ऑफलाईन सादर करणेसाठी मुख्य पृष्ठावरील ‘डाउनलोड’ या टॅब मध्ये ‘आधार सामग्री विनंती अर्ज’ ‘एम.एस.वर्ड’ किंवा ‘पीडीएफ’ स्वरुपात प्राप्त करून घेणे.
- मुख्य पृष्ठावरील ‘आधार सामग्री विनंती’ या टॅब मधील ‘आधार सामग्री उपलब्धता’ या सबटॅबद्वारे आधार सामग्रीची उपलब्धता माहिती प्राप्त होऊ शकते. तसेच मुख्य पृष्ठावरील ‘जलविज्ञान विषयक माहिती प्रणाली (HIS)’ या टॅब मधील ‘जलविज्ञान विषयक माहिती प्रणालीचे जाळे’ या टॅब अंतर्गत उपलब्ध नकाशांचे वापर करून सदस्यांना जलविज्ञान प्रकल्पाचे केंद्रे शोधता येतील.
- आधार सामग्री विनंती अर्जामध्ये डेटाविषयक व इतर आवश्यक माहिती भरून सही व कार्यालयाचा सिक्का उमटवून सदर अर्ज स्कॅन करावे व ‘sdscsdscnashik@gmail.com’ या ईमेलवर पाठवावे.
- या अर्जासोबत सदस्यांनी वर्गवारी प्रमाणे खालील तक्त्यात दिलेल्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी वर नमूद ईमेलवर पाठवावी. तसेच कागदपत्रांची मूळप्रत/सत्यप्रत ‘जलविज्ञान प्रकल्प, नाशिक’ येथे पोस्टाने अथवा स्वत: येऊन सादर करावी. आधार सामग्रीचे वितरण सदर कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतरच होईल, याची सदस्यांनी दक्षता घ्यावी.
अ.क्र.
|
जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता सदस्याची वर्गवारी
|
आवश्यक कागदपत्रे
|
01
|
शैक्षणिक/विद्यार्थी/संशोधन
|
- पीएचडी चालू असल्यास‘पीएचडी नोंदणी प्रमाणपत्र
- शैक्षणिक संस्थेचे खालील निर्दीष्ठीत करणारे पत्र-
-आधार सामग्री विनंती अर्जात नमूद संशोधनासाठी कोणतेही अनुदान प्राप्त नाही .
-आधार सामग्री केवळ शैक्षणिक कामासाठी वापरल्या जाईल.
- ‘माझे संशोधन किंवा ठराविक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर संशोधनाचा अहवाल सॉफ्ट किंवा हार्ड स्वरूपात एक प्रतित जलविज्ञान प्रकल्प नाशिक येथे प्राप्त करून देईल’ असे स्पष्ठ करणारे सदस्याचे हमी पत्र
- संशोधनाचे किंवा अभ्यासाचे एका पानात गोषवारा
- सदस्याच्या आधार कार्डची दोन्ही बाजूची छायाप्रत .
|
02
|
शासकीय/निमशासकीय
|
निरंक
|
03
|
खासगी
|
निरंक
|
04
|
शेतकरी
|
- तलाठी कार्यालयाकडून प्राप्त ७/१२ गोषवारा
|
05
|
शैक्षणिक संस्था
|
- पीएचडी चालू असल्यास‘पीएचडी नोंदणी प्रमाणपत्र
- शैक्षणिक संस्थेचे खालील निर्दीष्ठीत करणारे पत्र-
-आधार सामग्री विनंती अर्जात नमूद संशोधनासाठी कोणतेही अनुदान प्राप्त नाही .
-आधार सामग्री केवळ शैक्षणिक कामासाठी वापरल्या जाईल.
- ‘माझे संशोधन किंवा ठराविक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर संशोधनाचा अहवाल सॉफ्ट किंवा हार्ड स्वरूपात एक प्रतित जलविज्ञान प्रकल्प नाशिक येथे प्राप्त करून देईल’ असे स्पष्ठ करणारे सदस्याचे हमी पत्र
- संशोधनाचे किंवा अभ्यासाचे एका पानात गोषवारा
- सदस्याच्या आधार कार्डची दोन्ही बाजूची छायाप्रत
|
06
|
बिगर सरकारी संस्था
|
निरंक
|
07
|
वैयक्तिक
|
निरंक
|
वरील नमूद कागदपत्रांचे फॉरमॅटसाठी खाली क्लिक करावे:
- शैक्षणिक संस्थेचे खालील निर्दीष्ठीत करणारे पत्र-
-आधार सामग्री विनंती अर्जात नमूद संशोधनासाठी कोणतेही अनुदान प्राप्त नाही .
-आधार सामग्री केवळ शैक्षणिक कामासाठी वापरल्या जाईल.
- ‘माझे संशोधन किंवा ठराविक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर संशोधनाचा अहवाल सॉफ्ट किंवा हार्ड स्वरूपात एक प्रतित जलविज्ञान प्रकल्प नाशिक येथे प्राप्त करून देईल’ असे स्पष्ठ करणारे सदस्याचे हमी पत्र
- सदर अर्ज ‘राज्य आधार सामग्री साठवण केंद्र,नाशिक’ येथे प्राप्त झाल्यानंतर डेटा काढण्यात येईल व त्याप्रमाणे आधार सामग्रीचे देयक तयार करण्यात येईल. सदर देयक अदा करणेसाठी सदस्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी वर पाठविण्यात येईल.
- शैक्षणिक/विद्यार्थी/संशोधन: जर आधार सामग्रीचे शुल्क रु.१०,०००/- पेक्षा जास्त असल्यास, सध्याच्या आधार सामग्री धोरणाप्रमाणे विद्यार्थ्याला जलविज्ञान प्रकल्प नाशिक येथे येऊन स्वत:च्या संशोधनाविषयी सादरीकरण करणे बंधनकारक राहील.
- आधार सामग्रीचे देयक ऑनलाईन, ऑफलाईन किंवा बँक ट्रांझेकशन अशा तीन पद्धतीने भरता येऊ शकते. ऑनलाईन देयक भरणेकरीता मुख्य पृष्ठावरील ‘जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गट’ या टॅब अंतर्गत ‘देयक माहिती’ या सब टॅबमध्ये दिलेल्या लिंकवरून अदा करता येतील. जलविज्ञान प्रकल्प विभाग कार्यालयात आधार सामग्रीचे देयक ऑफलाईन अदा करता येतील. जलविज्ञान प्रकल्प विभागाची यादी ‘जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गट’ या टॅब अंतर्गत ‘जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गट कक्ष’ मध्ये उपलब्ध आहे.
- आधार सामग्रीचे शुल्क जवळील स्टेट बँकेत जमा करून ‘बँक ट्रांझेकशन आयडी’ ‘जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गट’ या मुख्य पृष्ठावरील टॅब मधील ‘देयक माहिती’ या अंतर्गत सदर माहिती सबमिट करू शकता. स्टेट बँकेचे नॉन-होमब्रांचमुळे अतिरिक्त ट्रांझेकशन चार्जेस लागू राहतील.
-
- आधार सामग्रीचे देयक अदा झाल्यानंतर व धारीकेस अंतिम मान्यता मिळाल्यानंतर, मागितलेली आधार सामग्री सदस्याच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठविण्यात येईल व तसे कळविणेसाठी एसएम.एस पाठविण्यात येईल.
- विद्यार्थी किंवा संशोधक सदस्य त्यांचे अभ्यास पूर्ण झाल्यानंतर ‘संशोधन प्रकल्प अहवाल पाठवा’ या टॅबद्वारे त्यांचे संशोधन अहवाल जलविज्ञान प्रकल्प कार्यालयास पाठवू शकतो. सदर अहवाल या कार्यालयास पाठविणे सदस्यांवरती हमी पत्रात नमूद केल्याप्रमाणे बंधनकारक राहील.
राज्य आधार सामग्री साठवण कक्ष, नाशिक येथे ऑफलाईन पद्धतीने आधार सामग्री विनंती सादर करणेसाठी प्रवाह तक्ता