जलविज्ञान प्रकल्प कार्य पद्धती
जलविज्ञान प्रकल्प (भूपृष्ठजल), महाराष्ट्र राज्य या कार्यालयांतर्गत कामाची रचना
कार्यालयाची स्थापना
- राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाच्या अंतर्गत राज्यातील भूपृष्ठ जलासंबंधी आधार सामग्री संकलनासाठी जागतिक बँकेच्या अटींची पूर्तता करून त्यांच्या अर्थसहाय्यातून मुख्य अभियंता, जलविज्ञान प्रकल्प, नाशिक या कार्यालयाची निर्मिती शासन निर्णय दिनांक १४/०६/१९९६ अन्वये करण्यात आली आहे.
- सदर कार्यालयाचे नामांकन हे कार्यालयीन फेररचनेमध्ये शासन निर्णय दि. १२/१०/२०१० प्रमाणे मुख्य अभियंता नियोजन व जलविज्ञान असे करण्यात आले.
- दि.१४/०१/२०१५ च्या शासन निर्णयान्वये धरण सुरक्षितता संघटना नाशिक (उपकरणे संशोधन विभागासह) तसेच जलनियोजन विभाग (पूर), जलगती संशोधन विभाग, व माहिती व्यवस्थापन कक्ष हे दि. ०१/०४/२०१५ पासून या कार्यालयास संलग्न झालेले आहेत.
- शा. नि. दि. ०५/०१/२०१९ अन्वये माहीती व्यवस्थापन कक्ष हे कार्यालय बंद करण्यात आलेला आहे. तसेच शा. नि. दि. ०७/०९/२०१९ अन्वये खोरे समरुपन विभाग, पुणे हे कार्यालय मु. अ., जलसंपदा विभाग, पुणे यांचेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
मुख्य अभियंता स्तरीय कामाचे थोडक्यात विवरण
- सरितामापन, पर्जन्यमापन व हवामान केंद्रांचे जाळे सनियन्त्रित करून, आधुनिक पध्दतीने जलहवामान विषयक आधार सामग्री संकलन, दृढीकरण, पृथ:करण,साठवणूक व वितरण करणे.
- नियोजित जलसंपदा प्रकल्पांसाठी क्षेत्रीय मुख्य अभियंता कार्यालयांनी सादर केलेल्या प्रस्तावांची जलशास्त्रीय तपासणी करुन पाणी उपलब्धता प्रमाणीत करणे.
- कृष्णा खो-यासाठी पुर पुर्वानुमानासाठी अद्ययावत पद्धतीने माहिती संकलीत करणे.
- महाराष्ट्रातील सर्व मोठ्या व मध्यम प्रकल्पांचा पूर व सुधारित पूर अभ्यास करणे.
- धरणांच्या उपांगाचा प्रतिकृती अभ्यास, धरणांचा पश्चजल अभ्यास व कालव्याचे विसर्ग मापन.
- राज्यातील जलसंपदा विभागामधील निवडक मोठी धरणे तसेच सर्व खाजगी धरणांच्या सुरक्षिततेबाबत वार्षिक तपासणी व अहवाल.
- राज्य तांत्रीक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून जलसंपदा विभागांतर्गत रु.२५ कोटी पेक्षा जास्त किमतीच्या अंदाजपत्रकांना प्रशासकिय व सुधारीत प्रशासकिय मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावांची तपासणी करणे. आज पर्यंत एकूण प्राप्त ३०४ प्रस्तावांची तपासणी केली.
- सिंहस्थ कुंभमेळा सन २०१५ या कालावधीत गोदावरी नदीतील जलप्रदुषण मोजण्याचे विशेष कामा अंतर्गत गोदावरी नदी उगम ते सायखेडा या भागातील निवडक १२ स्थळी दि. २५/०८/२०१५ ते २८/०९/२०१५ या कालावधीत जलगुणवत्तेचा कल तपासणीचे काम केले
- विशेष चौकशी समितीने निर्देशीत केलेल्या जलसंपदा प्रकल्पांच्या कामाबाबतच्या अहवालांची तपासणी करणे.
मा. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, वेस्टर्न झोन पुणे यांच्याकडील याचीका क्र. २५/२०१४ च्या संदर्भात दिलेल्या आदेशामधील सूचनांच्या परिपूर्ण अमंलबजावणी करण्यासाठीची कार्यवाही करणे.
या अंतर्गत
- पूर प्रभावित क्षेत्र, पूर रेषा आखणीची व्याप्ती निश्चीत करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे ठरविणे.
- पूर क्षेत्र- पूर रेषा आखणीची व्याप्ती निश्चीत करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे ठरविणे.
- पूर क्षेत्र- पूर रेषा आखणीचे अंदाजपत्रकातील बाबी निश्चीत करणे.
- पूर क्षेत्र- पूर रेषा आखणीचा कालावधी ठरविणे.
- क्षेत्रीय अधीका-यांना या विषयाबाबतच्या प्रशिक्षणाचे नियोजन करणे.
मंडळस्तरीय कामांचे थोडक्यात विवरण
मुख्य अभियंता, नियोजन व जलविज्ञान, नाशिक अधिनस्त १. आधार सामग्री संकलन, नियोजन व जलविज्ञान मंडळ नाशिक २. आधार सामग्री पृथ:करण मंडळ नाशिक ३. धरण सुरक्षा संघटना मंडळ, नाशिक, असे तीन मंडळ कार्यरत आहेत. सदर मंडळ कार्यालयांची माहिती खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
- आधार सामग्री संकलन, नियोजन व जलविज्ञान मंडळ नाशिक
- आधार सामग्री पृथ:करण मंडळ नाशिक
- धरण सुरक्षा संघटना मंडळ, नाशिक