• अ+
  • अ-
  • Services
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

सर्वसाधारण माहिती

सर्वसाधारण माहिती

१. पार्श्वभूमी

१.१ धरण निरिक्षणालय

महाराष्ट्र राज्यात १९८० पर्यंत विविध बांधकाम प्रकारची (काँक्रीट, दगडी, माती धरणे इ.) व विविध क्षमतेची सुमारे १000 धरणे बांधण्यात आली होती. धरण बांधण्यात येत असलेल्या नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात गाव/शहरे असतात. धरण फुटीच्या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तीत हानी संभवतात त्यामुळे सदर हानी टाळण्याच्या अनुषंगाने धरणाची सुरक्षितता अत्यंत महत्वाची ठरते.

शासन निर्णय क्र.वि. /१०७८/२३१८/आयएमजी-२ दि.१०/०९/१९८०  अन्वये धरण सुरक्षा निरीक्षणालयाची धरणाची तपासणी व सुरक्षिततेच्या अनुषंगाने सहाय्यभूत होणेस्तव स्थापना करण्यात आली. धरण तपासणी व सुरक्षा सेवेत ४ ते ५ मुख्य अभियंत्यांचे नामनिर्देशने करण्यात येऊन शासन स्तरावर मुख्य अभियंता व सहसचिव यांना समन्वय करण्यात आले व  समितीने धरण सुरक्षा संबंधी सादर केलेल्या शिफारशी बंधनकारक करण्यात आल्या.

१.२ धरण सुरक्षितता संघटना (ध.सु.सं)

धरण सुरक्षा संबंधी वाढीव कामाचा विचार करता एक मंडळ कार्यालय व तीन विभागीय कार्यालये शासन निर्णय क्र. PM१०८५/१/८५/आयएम दि. १४/०३/१९८५ अन्वये कार्यान्वित करण्यात आली.

१.२.१ कालवा सुरक्षा विभाग (का.सु.वि.)

महाराष्ट्र सिंचन आयोगाने शिफारस केल्यानुसार कालव्याची बांधकामे तपासणी देखील आवश्यक असल्याने तत्कालीन  मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेतील संकल्प विभाग (नियोजन व आराखडा क्र. ३) तत्कालीन धरण सुरक्षितता संघटनेस शासन निर्णय क्र.मसंसं - ११/०२/६५५/२००२)/एमपीए दि. ३०/११/२००२ अन्वये जोडण्यात आला.

विभागाचे नाव व विभागाकडून करण्यात येत असलेले काम यात सुसंगती असावी या दृष्टीने शासन निर्णय क्र २०१७/६२३/C-क्र. ३०४/२०१७ आस्थापना(प्रशिक्षण) दि. १९/१२/२०१७ अन्वये सदर विभागाचे नामकरण कार्यकारी अभियंता, कालवा सुरक्षा विभाग,नाशिक असे करण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रातील जलसंपदा विभागातील कालवे हे सदर विभागाच्या कार्यक्षेत्रात येतात  .

१.२.२ उपकरणे संशोधन विभाग (उ.सं.वि)

शासन निर्णय क्र. मेरिम - ०११५/क्रमांक ०१/२०१५/डब्ल्यूआर/(धोरण) दि. १४/०१/२०१५ अन्वये उपकरणे संशोधन विभाग मेरी हा भुकंप मापक उपकरणे उपकरणे व भूकंप आधार सामुग्री पृथ:करण या कक्षासह धरण सुरक्षितता संघटनेस जोडण्यात आला आहे.

१.२.३ धरण सुरक्षितता कक्ष (ध.सु.क)

जागतिक बॅंक सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापनेसाठी राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष शासन निर्णय क्र.संकीर्ण - २०१७/(१३९)/१७/आयएमडब्ल्यू दि.११/०४/२०१९ अन्वये स्थापन करण्यात आला आहे.

विविध धरण सुरक्षितता संघटना,जलविज्ञान,मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना,यांत्रिकी विभाग, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था यातील विविध अधिका-यांना जबाबदारी देण्यात येऊन तसेच त्यांचे नामनिर्देशने करण्यात येऊन सदरचे कार्यालयातील जैसे की,राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला.

धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्प टप्पा-2 व 3 प्रकल्पांचे परिणामकारक संनियंत्रणाच्या अनुषंगाने शासन निर्णय क्र. रिव्ह्यू २०१९/सी.एस.१९/१९/एस्टॅब्लिशमेंट (रिस्ट्रक्चरिंग) दि. २०/०५/२०२० अन्वये धरण सुरक्षा कक्ष हा राज्य धरण सुरक्षितता संघटनेस जोडण्यात आला आहे.

 

 



शेवटचे सुधारित केले: ०८ मे २०२६