• अ+
  • अ-
  • Services
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

एककालिक आधार सामग्री संकलन प्रणालीचे उपकरणे

 

एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली (RTDAS) खालील तीन टप्प्यामध्ये कार्य करते 

आधार सामग्री संकलन प्लॅटफॉर्म  (डीसीपी) : 

या प्लॅटफॉर्म अंतर्गत सेन्सर बसविले असतात तसेच या द्वारे विविध सेन्सरला वीज पूरविठा करणे, सौर पॅनेल वापरुन बॅटरी चार्ज करणे, डेटा लॉगरमध्ये डेटा साठविणे आणि धूळ,पाणी आणि चोरीपासून उपकरणांना संरक्षण प्रदान करणे, इत्यादी कामे करण्यात येतात. एककालिक केंद्राच्या जाळ्यामधील बर्‍याच केंद्रांवर कोणतेही वीज कनेक्शन नसल्यामुळे बॅटरीज सौरउर्जेने चार्जिंग केल्या जातात.

 

टेलीमेट्री उपकरणे:

ही  उपकरणे  डीसीपी डेटा लॉगर मधून माहिती गोळा करतात व योग्य टेलिमेट्री पद्धतीने डेटा सेंटरला माहिती प्रक्षेपित केल्या जाते. या प्रकल्पांतर्गत प्रस्तावित टेलिमेट्री पद्धतीत टेलीमेट्री ग्लोबल सिस्टम फॉर मोबाइल (GSM) / जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस (GPRS), इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टम (INSAT) आणि व्हेरी  स्मॉल अ‍ॅपर्चर टर्मिनल (VSAT) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. 

डेटाबेस  व्यवस्थापन प्रणाली:

डेटा सेंटरमध्ये सदर प्रणाली कार्यान्वित केलेली असून टेलीमेट्री उपकरणेद्वारे कार्यक्षेत्राती एककलिक माहिती प्राप्त करते. त्यानंतर आधारसामग्री ची गुणवत्ता आणि सुसंगततेसाठी तपासणी केली जाते व संरचित स्वरूपात संग्रहित करून उपभोक्त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जाते. या विभागातून राष्ट्रीय डेटाबेस व्यवस्थापन सॉफ्टवेअर जसे ई-स्विस/विम्स याद्वारे सर्व केंद्रीय जल आयोग (CWC) एजन्सींना माहिती पुरविण्यात येते.

 

एककालिक आधार सामग्री संकलन प्रणाली (RTDAS) वैशिष्ट्ये 

  • जलविज्ञान प्रकल्प (भूपृष्ठ जल), महाराष्ट्र शासन अंतर्गत एककालिक जलहवामान आधार सामग्री संकलन प्रणाली राबविण्यात आलेली आहे व या प्रणाली मार्फत खोऱ्यांमध्ये येणारे पाण्याचे आवक व इतर संबंधित गोष्टीचे पूर्वानुमान दिल्या जाते.
  • एककालिक आधार सामग्री संकलन  प्रणाली (RTDAS) मध्ये स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र, स्वयंचलित हवामान केंद्र आणि स्वयंचलित नदी व जलाशयातील पाणी पातळी मापन केंद्र या टेलिमेट्री उपकरणाच्या जाळ्याचा समावेश होतो व याद्वारे सदर प्रणालीला माहिती पुरवठा करण्यात येते. 
  • आधुनिक डेटा लॉगर, डेटा साठवण प्रणाली, डेटा प्रोसेसिंग, डेटा कॉम्म्युनिकेशन टेकनॉलॉजी या सर्व गोष्टींचा एकत्रित लाभ घेऊन सदर संकल्पनेची अमलबजावणी या महत्वाकांक्षी प्रकल्पात केली आहे. 
  • एककालिक आधार सामग्री संकलन प्रणालीच्या जाळीची सर्वात जास्त विश्वासार्हता असून सदर प्रणालीमध्ये देखभाल दुरुस्तीचे काम फार कमी आहे. 

 

एककालिक आधार सामग्री संकलन प्रणालीचे (RTDAS) फायदे 

  • एकूण खर्चातील बचत
  • आधार सामग्रीची  उच्च वारंवारता 
  • अनुकूल परिस्थितीत चांगली संवेदन क्षमता 
  • अनुकूल परिस्थितीत सुद्धा केंद्रे कार्यान्त्वित ठेऊ शकतो
  • गोळा केलेली माहिती सहज बघू शकतो 
  • मोजमापातील सुसंगतता आणि आक्षेपार्हता 
  • स्वयंचलित गुणवत्ता सनियंत्रण क्षमता

 

एककालिक आधार सामग्री संकलन  प्रणाली (RTDAS ) उपकरणे

  1. स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र
  2. स्वयंचलित हवामान केंद्र
  3. स्वयंचलित सरिता पाणी पातळी व सरिता विसर्ग मापन केंद्र
  4. स्वयंचलित जलाशय पाणी पातळी व उत्प्रवाह मापन केंद्र

 

मोजमापन वारंवारता

 

केंद्राचे प्रकार

मापदंड व मोजण्याचे एकक 

वारंवारता

स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र  (एआरजी) 

पर्जन्यमान  (एमएम)*

प्रत्येकी १५ मिनटांनी (जीएसएम टेलिमेट्रीसाठी)

प्रत्येकी ६० मिनटांनी (व्हीसॅट टेलिमेट्रीसाठी )

स्वयंचलित हवामान केंद्र  (एडब्लूएस/एएफसीएस)

किमान तापमान  (°से) *

प्रत्येकी ६० मिनटांनी (जीएसएम व व्हीसॅट या दोन्ही टेलिमेट्रीसाठी )

कमाल तापमान  (°से) *

किमान आर्द्रता (%)*

किमान वाऱ्याचा वेग (मी/सेकंद) *

कमाल वाऱ्याचा वेग (मी/सेकंद) *

किमान वातावरणीय दबाव (एचपीए) *

कमाल वातावरणीय दबाव (एचपीए) *

कमालसौर विकिरण (डब्लू/वर्ग मी.)*

स्वयंचलित जलाशय पाणी पातळी व उत्प्रवाह मापन केंद्र  (एआरडब्लूएल अँड ओडीएस)

जलाशयाची पाणी पातळी (मी.) *

प्रत्येकी ६० मिनटांनी (जीएसएम व व्हीसॅट या दोन्ही टेलिमेट्रीसाठी )

ग्रॉस कन्टेन्ट (दलघमी)

% कन्टेन्ट (%)

लाईव्ह कन्टेन्ट (दलघमी)

विसर्गाचा दर (क्युमेक्स)*

स्वयंचलित सरिता पाणी पातळी व सरिता विसर्ग मापन केंद्र (एआरडब्लूएल अँड आरडीएस)

नदी पातळी (मी.) *

प्रत्येकी १५ मिनटांनी (जीएसएम टेलिमेट्रीसाठी)

प्रत्येकी ६० मिनटांनी (व्हीसॅट टेलिमेट्रीसाठी )

स्टेज डिस्चार्ज (क्युमेक्स)

 

(एआरजी / एआरएस : स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र

(एडब्लूएस/एएफसीएस)   : स्वयंचलित हवामान केंद्र

(एआरडब्लूएल अँड आरडीएस)   : स्वयंचलित सरिता पाणी पातळी व सरिता विसर्ग मापन केंद्र 

(एआरडब्लूएल अँड ओडीएस) : स्वयंचलित जलाशय पाणी पातळी व उत्प्रवाह मापन केंद्र

 

शेवटचे सुधारित केले: १३ जून २०२५