• अ+
  • अ-
  • Services
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

इंडिया वॉटर रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टम (इंडिया-डब्ल्यूआरआयएस) आणि स्टेट वॉटर इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एसडब्ल्यूआयसी)

 

परिचय – इंडिया – डब्ल्यूआरआयएस

जलसंपत्ति माहिती सर्वांना खुली करणे, आधार सामग्रीचे वितरण करणे, हे महत्वाचे पैलू समोर ठेऊन इंडिया – डब्ल्यूआरआयएस या प्रकल्पासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करणेसाठी राज्यातील जलसंपत्ति माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. पाणी निगडीत क्षेत्रातील वेगवेगळे आव्हाने व समस्या बघून, भारत सरकारने राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीकृत प्रणाली विकसित केले असून जलसंपत्ति व संबंधित सर्व आधार सामग्री या प्रणालीवर साठवण्यात येईल. सदर प्रणालीचे सनियंत्रण करणेसाठी राज्यातील वेगवेगळे प्रशासकीय स्तर निहाय्य किंवा जलशास्त्रीय प्रकारानुसार जसे खोरे, उपखोरे निहाय  नियंत्रक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. जलसंपत्तिची सद्यस्थिती विषयी  जनजागृती वाढवून पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे व पाण्याचे सर्वकष जतन करणे च्या दृष्टीने इंडिया – डब्ल्यूआरआयएस भर देत आहे. जलसंपत्तीच्या क्षेत्रात जी.आय.एस. व रिमोट सेन्सिंग (दूर संवेदन) या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जलसंपत्ती संबंधित विविध मापदंडांचे नकाशेरेखन करणे, मूल्यमापन करणे व व्यवस्थापन धोरण निश्चिती करणे, ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारची आधार सामग्री संकलित करणे, मानकीकरण करणे व राष्ट्रीय स्तरावर ही माहिती साठवून ठेवणे इत्यादींचा समावेश होतो. अशा प्रकारे सर्व उपभोक्त्यांसाठी जागतिक स्तरावर मानांकीत असलेली  व पारदर्शक प्रणाली सार्वजनिक हितासाठी कार्यरत करावयाची आहे. इंडिया डब्ल्यूआरआयएसच्या संकेतस्थळाला भेट देणेसाठी येथे क्लिक करा.

https://indiawris.gov.in/wris/#/

 

 

शेवटचे सुधारित केले: १६ एप्रिल २०२६