• अ+
  • अ-
  • Services
image
Opening times
Mon - Sat: 7.00 - 18:00

परिचय

 जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटाचे परिचय व थोडक्यात माहिती

जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गट हे आधार सामग्री वापरकर्त्यांचे राज्य व राष्ट्रस्तरीय प्रातिनिधिक गट आहे. ज्यामध्ये आधार सामग्री वापरकत्यांचे जल स्त्रोताचे वापर, मुल्यांकन व व्यवस्थापन इत्यादीमध्ये भागभांडवल आहे. संभाव्य आधार सामग्री वापरकर्ते ओळखणेसाठी, त्यांच्या आधार सामग्री संबंधित गरजांचे विष्लेषण करणेसाठी व जलविज्ञान विषयक माहिती प्रणालीचे आउटपुट नेहमी ‘डिमांड-ड्रीवन’ असणेसाठी जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटाची आवश्यकता आहे.

जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटामधील सदस्यांचे राज्याच्या भू-पृष्ठ जल व भूजल विभाग या दोन्हीसाठी सामाईक उपभोक्ता सदस्य म्हणून समावेश असतो. तसेच राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीय जल आयोग व केंद्रीय भूजल मंडळ अंतर्गत सदर गटातील सदस्यांचे उपभोक्ता म्हणून समावेश होतो. जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटातील सर्व सदस्यांचे राज्य स्तरीय किंवा केंद्र स्तरीय मंचामध्ये समावेश करून जनरल बॉडी तयार केली जाते. राज्य स्तरीय किंवा राष्ट्र स्तरीय आधार सामग्री केंद्राचे सचिव या जनरल बॉडीचे सहाय्य करतील. काही विशिष्ठ कामाचे परीक्षण करणे किंवा ते कशाप्रकारे करण्यात यावे त्याबद्दल जनरल बॉडीचे सदस्य चर्चा करू शकतात व तसे सुचवू शकतात.

जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गट स्थापन करण्याचे हेतू:

  • जलहवामान आधार सामग्री पुरवठादारक व वापरकर्ते यांच्यामध्ये सामाईक व्यासपीठ तयार होणेसाठी.
  • वापरकर्त्यामध्ये जलविज्ञान विषयक माहिती प्रणाली विषयी जागृती येणेसाठी.
  • आधार सामग्री वापरकर्त्यांच्या गरजा समजणेसाठी, गरजांचे विष्लेषण करणेसाठी व माहिती अद्यावत करणेसाठी 
  • आधार सामग्री संकलनाच्या जाळ्यांमध्ये काही गोष्टी वाढविणे किंवा हटविणेसाठी पुनरावलोकन करणे व त्यावर योग्य ती शिफारस करणे.

विविध संस्थान मार्फत जलहवामान आधार सामग्री वापरण्यात येत आहे. उदा. जलसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग, जल संवर्धन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे विभाग, वन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, संशोधक व इतर राज्य व केंद्रीय संस्था, इत्यादी. जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटातील सदस्यांनाच सदर माहिती पुरविण्यात येते. 

जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटातील कामांची व्याप्ती:

वर्तमान व संभाव्य मोठ्या प्रमाणातील व पुनरावृत्ती करणारे जलविज्ञान विषयक माहिती प्रणालीच्या वापरकर्त्यासाठी जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गट  ही एक प्रातिनिधिक स्वरुपाचे मंडळ आहे. या मंडळास दोन मुख्य भूमिका देण्यात आलेल्या आहेत.

  • सल्लागार भूमिका
  • मागणी-पुरवठा दुवा भूमिका

या भूमिकेंमध्ये कामाच्या व्याप्ती प्रमाणे जनरल बॉडीला काही कार्ये करायची असतात.

  • सल्लागार भूमिका
    • विविध उपभोक्त्यांनी मागीतलेल्या आधार सामग्रीचे स्वरूप, प्रकार, वारंवारता, आणि व्याप्ती इत्यादी बाबत सदस्य सचिवास सल्ला देणे.
    • जलविज्ञान विषयक माहिती प्रणालीचे जनजागृतीकरण कसे करावे या बाबत सदस्य सचिवास सल्ला देणे.
    • सदस्य सचिवांनी दिलेल्या विविध शैक्षणिक व इतर साहित्यांचा अध्यास करणे 
    • जलविज्ञान विषयक माहिती प्रणाली अंतर्गत शैक्षणिक संस्था व इतर उपभोक्त्यांना सल्ला देणे 
    • आधार सामग्री उपभोक्त्याच्या प्रतिनिधीचे मते समाविष्ठ करणेसाठी सुचविणे.
    • वितरण प्रणाली अंतर्गत आधार सामग्रीचे योग्य दर ठरविणेसाठी शिफारस करणे.
    • जलविज्ञान विषयक माहिती प्रणाली अंतर्गत उपलब्ध आधार सामग्री उपभोक्त्यांसाठी आकलनीय व सोयीस्कर स्वरुपात करणेसाठी सर्वोत्तम शक्य ते साधन सुचविणे.
    • कार्यगट तयार करणे.
  • मागणी-पुरवठा दुवा भूमिका
    • जलविज्ञान माहितीची गरजा कळविणेसाठीच्या आयोजनात मदत करणे
    • आधार सामग्रीचे पुरवठा स्वरूप संकल्पित करणेसाठी मदत करणे.
    • वेगवेगळी मते, धोरणे व मार्गदर्शक तत्वे यांची योग्य शब्द मांडणी करणेसाठी मदत करणे.
    • जलविज्ञान विषयक माहिती प्रणालीच्या कार्य क्षमतेबद्दल अभिप्राय देणे.
    • कार्यशाळा, परिसंवाद, बैठके, व इतर चर्चासत्रात भाग घेणे.

जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटाच्या सदस्यत्वाची नोंदणी करणे

जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटाच्या सदस्यत्वाची नोंदणी पाच वर्षासाठी नोंदणी फी रु. ५००/- भरून व आजीवन कालावधीसाठी नोंदणी फी रु.२५००/- भरून सर्वांसाठी उपलब्ध आहे.

जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटाच्या सदस्यांना आधार सामग्री सशुल्क पुरविण्यात येते. आधार सामग्रीच्या प्रकारानुसार असलेले दर, त्या दरावरील सुट, नोंदणी अर्ज आणि आधार सामग्री विनंती अर्ज इत्यादी गोष्ठी या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. जलविज्ञान प्रकल्प (भूपृष्ठ जल), नाशिक व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे या दोन्ही संस्थेकडून जलहवामान आधार सामग्री प्राप्त करून घेणेसाठी सदर सदस्याची नोंदणी सामाईकपणे दोन्ही संस्थेस लागू राहतील.  

जलहवामान आधार सामग्री उपभोक्ता गटाच्या सदसयाची आकडेवारी

वर्ष

शासकीय

निमशासकीय

शैक्षणिक 

गैर-शासकीय संस्था

खासगी

इतर

एकूण

१९९९

             

२०००

This information shall be fetched from Backend of Existing Website

शेवटचे सुधारित केले: १३ जून २०२५